जळगाव लाईव्ह न्यूज। ६ एप्रिल २०२२। माहेरहून पैसे आणावे यासाठी विवाहितेचा मानसिक छळ केल्याप्रकार समोर आलाय. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक असे की, सुरेश नगरातील माहेर असलेल्या सिमा सचिन कुमावत (वय-२९) यांचा विवाह सचिन शांताराम कुमावत यांच्याशी रितीरिवाजानुसार विवाह झाला आहे. लग्नाच्या दोन वर्षांपासून विवाहिता सिमा कुमावत यांना पती सचिन कुमाावत, सासू चंद्रकला कुमावत, जेठ संदीप कुमावत (रा. निफाड, जि. नाशिक) यांच्याकडून माहेरून पैसे आणावे म्हणून शारीरिक मानसिक छळ केला जात होता.
अखेर सासरच्या जाचाला कंटाळून सिमा यांनी माहेर गाठले आणि रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सासरच्या मंडळींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहेत.