भुसावळ येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा शोभायात्रा
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । भुसावळ शहरातील स्वरुप कॉलनी आयोध्या नगरात श्री गणेश, श्री कार्यसिद्धी हनुमान व महादेव मंदिरात तीन दिवसीय प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मंगळवारपासून सुरुवात झाली. त्यात सायंकाळी मूर्ती नगरप्रदक्षिणा करण्यात आली. बुधवार व गुरुवारी प्राणप्रतिष्ठा होईल. स्वरुप कॉलनी, आयोध्या नगर मित्र परिवाराने हा सोहळा आयोजित केला आहे.
मंगळवारपासून तीन दिवसीय प्राणप्रतिष्ठा उत्सवाला सुरुवात झाली. यात सकाळी जलमातृका पुजन, जलयात्रा कलशयात्रा व सायंकाळी मूर्ती नगरप्रदक्षिणा झाली. बुधवारी (दि.६) सकाळपासून शांतीपाठ, मुख्य संकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, मूर्ती संस्कार, जलाधीवास, धान्याधीवास, धुपादीवास, ग्रह हवन असे धार्मिक विधी होतील. सायंकाळी आरती होईल. गुरुवारी (दि.७) सकाळी शांतीपाठ, स्थापित देवता पूजन, मूर्ती स्थापना, मुख्य हवन, बलीदान, पुर्णाहूती होईल. रात्री ८ वाजता सुदंर-कांड पाठ वाचन होईल. शनिवारी (दि.१६) हनुमान जयंतीनिमित्त सकाळी १० ते १२ वाजेदरम्यान महाप्रसाद वाटप होईल.