जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । शेती वाटणीवरून एका ४४ वर्षीय महिलेसह तिच्या मुलाला मारहाण करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी यावल पोलीसांत चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
यावल तालुक्यातील एका गावात ४४ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. वडीलोपार्जीत शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी शेतीच्या हिस्से व वाटणीवरून गावातील नातेवाईक असलेले चार जणांनी महिला व तिच्या मुलाला शिवीगाळ करून मारहाण केली. यातील एकाने महिलेचा पदर ओढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. आणि शेतीचा हिस्सा मागाल तर तुमच्या दोघांचा मुडदा पाडू, तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. यासंदर्भात महिलेने यावल पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. अखेर त्यांच्या तक्रारीवरून अखेर मंगळवार ५ एप्रिल रोजी चार जणांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजिज हमीद शेख करीत आहे.