जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । |
महाराष्ट्रासह काेकण आणि गाेव्यावर पुढील चार दिवस मध्य अवकाळी पावसाचे सावट आहे. तापमान ४३ अंशांपुढे गेलेले असताना अवकाळीचे सावट उभे राहिले आहे. या वाऱ्याचा वेग ताशी २८ किमीपर्यंत तर वाऱ्याची झुळूक, वावटळींचा वेग ताशी ४० ते ५० किमीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी केळी, मका, गहू या पिकांना वाचवण्याचे माेठे अाव्हान शेतकऱ्यांपुढे अाहे. मंगळवारपासून उत्तर-मध्य महाराष्ट्रात वातावरण ढगाळ असेल. ५ ते ७ एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस हाेईल. या काळात तापमान मात्र ४२ ते ४३ अंशांच्या जवळपास राहणार अाहे. तापमान कायम असताना पावसाची शक्यता असल्याने विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह वादळही निर्माण हाेण्याची शक्यता अाहे. स्थानिक वातावरणात तयार हाेणाऱ्या वादळाचा ताशी वेग ४० ते ५० किमीपर्यंत असू शकताे. या स्थितीत अचानक वाऱ्याचा वेग वाढल्याने केळी, मका, गहू ही पिके अाडवी पडू शकतात. पावसापेक्षाही वादळांमुळे हाेणारे नुकसान अधिक हानी करणारे ठरू शकते. दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात येणाऱ्या अवकाळी पावसातील वादळांमुळे शेतीच्या पिकांचे सर्वाधिक नुकसान हाेत असते. गेल्या वर्षी ५०० हेक्टर केळीच्या बागा भुईसपाट झाल्या हाेत्या. हवामान खात्याने अंदाज वर्तवल्यापासून केळी, मका अाणि गहू उत्पादक शेतकरी चिंतेत अाहेत. |