⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | पारोळा | कौतुकास्पद : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकाने चार चाकी ट्रॉली बनविली अन्…

कौतुकास्पद : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकाने चार चाकी ट्रॉली बनविली अन्…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासांठी गेल्या काही महिन्यांपासून बेमुदत संप पुकारले आहे. यामुळे प्रवाशांचे तर हाल होतच आहे परंतु, ग्रामीण भागातील शाळकरी मुलांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहेत. ज्यांच्याकडे खाजगी वाहन आहेत ते त्याचा उपयोग करून आपल्या पाल्यांना शाळेत पोहचवत आहेत. तर ज्याच्याकडे खाजगी वाहनही नाही त्यांना मात्र, ऑटो किंवा अन्य वाहच्या माध्यमातून शाळेत पोहचावे लागत आहे. तर काही विध्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.

त्या विद्यार्थ्यांचे ही शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणनू समाजातील काही शिक्षणप्रेमी आपआपल्या पद्धतीने प्रयत्न करतांना दिसतात. पारोळा तालुक्यातील दगडी सबगव्हाण येथील “आयटीआय” टेहु ता.पारोळा येथे कार्यरत शिक्षक एम.व्ही.पाटील यांनी दगडी सबगव्हाण ते टेहु रोज ये-जा करतात, असे करतांना वाहना अभावी घरी राहणारे विद्यार्थी बघुन त्यांनी त्यांना मदत करण्याचे ठरवून आपल्या कल्पनाशक्तीने १० क्विंटल वजन ओढू शकेल अशी चार टायरची छान ट्रॉली बनविली व ती आपल्या मोटर सायकलला जोडणी करण्याची सोय केली. जानेवारी महिन्यापासून शाळा उघडल्या पासून ते रोज १० ते १२ विद्यार्थ्यांना बसवून पारोळा येथे नियमित त्यांना शिकवणी व शाळेच्या कामासाठी सोडतात. संध्याकाळी परत जातांना त्यांना परत नेतात. पाटील यांच्या या शैक्षणिक सेवेचे व स्तुत्य उपक्रमाचे परिसरात मोठे कौतुक होत आहे.

दगडीसबगव्हाण हे पारोळा – धरणगाव रस्त्यावर राजवड नजिक रस्त्यापासून ५ किलो मिटर आतमध्ये आहे. विध्यार्थ्यांना इतर वाहन मिळणेही अवघड आहे. त्यामुळे विद्यार्थी पाटील यांच्या उपक्रमाचा योग्य लाभ घेत आहेत. या धाबे, तांबोळे व उत्रड परिसरातील बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सतत धडपडणारे राज्य शिक्षक मनवंतराव साळुंखे यांनी पाटील यांचे अभिनंदन व कौतुक करून समाजातील इतर बांधवांनीही रस्त्यावर वाहनाची वाट बघत असलेल्या विद्यार्थ्यांना लिफ्ट देवून सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह