सराईत दुचाकी चोरट्याला बेड्या; दाेन दुचाकी केल्या जप्त
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । दुचाकी चोरीसह इतर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास एमआयडीसी पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या आहे. रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसुंबा गावातून दिलीप शिवदास गोपाळ यांची दुचाकी (एमएच १९ सीएम ६४५) १९ मार्च रोजी चोरीस गेली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गोपाळ यांची दुचाकी रितेश शिंदे याने चोरी केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांना मिळाली. त्यानुसार, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, रवींद्र चौधरी, विकास सातदिवे, गणेश शिरसाळे, योगेश बारी, गोविंदा पाटील यांच्या पथकाने रामेश्वर कॉलनीत सापळा रचून रितेशला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. रितेश विरुद्ध चोरी, घरफोडी, जबरी चोरी, शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे त्याच्यावर आहेत.