जळगाव जिल्हा

वकिलांनी धरला दिव्यांगांसोबत ठेका

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२१ । जिल्ह्यातील द जळगाव डिस्ट्रिक्ट लॉयर्स कंझुमर कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे मराठी नववर्षाचे औचित्य साधत रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्राला स्मार्ट एलईडी टीव्ही भेट देण्यात आला.

उडानच्या कार्यालयात एक छोटेखानी कार्यक्रम पार पडला. प्रसंगी व्यासपीठावर जळगाव जिल्हा वकील ग्राहक सहकारी संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष अ‍ॅड.संजय राणे, उपाध्यक्ष अ‍ॅड.व्ही.आर.घोलप, सचिव अ‍ॅड.पी.आर.झंवर, आर्किटेक्ट स्नेहल काबरा आदी उपस्थित होते. संस्थेतर्फे दिव्यांग मुलांसाठी स्मार्ट एलईडी टीव्ही भेट देण्यात आला. प्रसंगी अध्यक्ष अ‍ॅड.संजय राणे यांनी, आम्ही आज दिव्यांग मुलांशी जुळलो आहोत. भविष्यात काहीही सहकार्य लागल्यास सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला द जळगाव डिस्ट्रिक्ट लॉयर्स कंझुमर कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अ‍ॅड.रमाकांत पाटील, अ‍ॅड.सागर चित्रे, अ‍ॅड.महेश भोकरीकर, अ‍ॅड.मुकेश शिंपी, अ‍ॅड.कुणाल पवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी उडानच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, विजय पालवे, धनराज कासट, चेतन वाणी, गौरी बारी यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


डिस्ट्रिक्ट लॉयर्स कंझुमर कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे उडान संस्थेला टीव्हीचे भेट दिल्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर केले. दिव्यांगांच्या हाकेला साद देत वकिलांनी देत त्यांच्यासोबत ठेका धरत त्यांना प्रोत्साहन दिले.

Related Articles

Back to top button