जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२२ । केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयातर्फे भावी शिक्षकांच्या विकासासाठी सकारात्मक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यात डॉ.उल्हास पाटील स्कूल, जळगाव, आणि निर्मल स्कूल पाचोरा या दोन शाळांमार्फत मुलाखती घेण्यात आल्या. यापूर्वी पोदार स्कूल मार्फत मुलाखती घेण्यात आल्या होत्या पुढील मे महिन्यात आणखी काही शाळांना आमंत्रित करून परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.केतन चौधरी यांनी दिली. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे यांचे मार्गदर्शन लाभले. नियोजन समन्वयक उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी, डॉ. डॉ. गणेश पाटील, प्रा. किसन पावरा यांनी केले.








