दुतिया दांपत्याला मारहाण करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करा : भाजप

मार्च 30, 2022 6:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२२ । धरणगाव येथील हेमंत दुतिया यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियात व्हायरल केल्याचा आरोप करीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दुतिया दांपत्याला मारहाण केली होती. याचा भाजपा महिला आघाडीतर्फे निषेध करण्यात आला. तसेच या प्रकणातील दोषींवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे ऐडिशनल अधिक्षक कुमार चिंता यांच्याकडे केली असून कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

bjp 12 jpg webp

भाजपा जिल्हा महानगर महिला आघाडीचे अध्यक्षा दिप्तीताई चिरमाडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. या प्रसंगी महिला मोर्चा सरचिटणीस रेखा वर्मा, जिल्हा महानगर उपाध्यक्ष रेखा कुळकरणी, वंदना पाटील, ज्योती निंभोरे, ज्योती राजपूत, सरोज पाठक, छाया सारस्वत, मीनाक्षी पाठक, ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षा रेखा पाटील, ज्योती तिवारी ऋतुजा संत व महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now