जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२२ । भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्या ताब्यातून 80 हजार रुपये किंमतीचे आठ मोबाईल जप्त केले आहेत. मजीत जुम्मा तडवी (24, जांभोळ, वाकोद, ता.जामनेर) व विनोद राध्येश्याम भोई (28, नवीन सांगवी, पावर हाऊसजवळ, पहुर, ता.जामनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
झेलम एक्स्प्रेसमधून आवळल्या मुसक्या
11078 अप झेलम एक्स्प्रेसमध्ये दोन्ही संशयीत आरोपी फिरताना आढळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान त्यांनी प्रवाशांकडील चोरलेले आठ मोबाईल काढून दिले. ही कारवाई औरंगाबाद अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ लोहमार्गचे पोलिस निरीक्षक विजय घेर्डे, हवालदार दिवाणसिंग राजपूत, अजीत तडवी, धनराज लुले, जगदीश ठाकूर, सागर खंडारे, बाबू मिर्झा आदींच्या पथकाने केली.