विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांनी रायसोनी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राला दिली भेट

मार्च 28, 2022 6:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२२ । रायसोनी महाविद्यालयाला शैक्षणिक क्षेत्रातील मानाचा ‘स्वायत्तता दर्जा’ बहाल करण्यात आल्यानंतर रायसोनी महाविद्यालयाने कोरोनानंतर आपल्या महाविद्यालयात एमबीए, एमसीए व बीटेक या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा आयोजित केल्याने या परीक्षाचे नियोजन पाहण्यासाठी येथील विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राला भेट दिली.

visit jpg webp

यावेळी त्यांनी ऑटोनॉमस झाल्यानंतर प्रथम वर्षाची परीक्षा घेत असलेल्या रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील परीक्षांचे नियोजन पाहत समाधान व्यक्त केले. तसेच परीक्षा नियंत्रण कक्षात जात परीक्षा कशापद्धतीने घेतली जात आहे याचा आढावा घेतला. रायसोनी महाविद्यालयाकडून नवनियुक्त कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी रायसोनी इस्टीट्युटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा.डॉ. प्रिती अग्रवाल, महेंद्र रायसोनी, ऍकडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, प्रा.तुषार पाटील, प्रा.रफिक शेख, प्रा.तन्मय भाले, प्रा.राज कांकरिया, प्रा.ज्योती जाखेटे, प्रा.बिपासा पात्रा, प्रा. स्वाती पाटील, प्रा दिपेनकुमार रजक व आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now