⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

ट्रक-दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२२ । पाचोरा तालुक्यातील वरखेडी जवळील सरकारी रुग्णालयासमोर ट्रक व दुचाकीचा झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. भंगलाल राठोड असे अपघाती दुचाकीस्वाराचे नाव आहे. ही घटना २६ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली.

पिंपळगाव हरेश्वर गावाकडून मोसंबीने भरलेला ट्रक (एचपी- १७, यु- ७२८५) घेवून चालक महेंद्रसिंग रघुवीरसिंग हा पाचोऱ्याकडे जात हाेता. याचवेळी वरखेडी बस स्थानकाकडून वरसाडे येथील रहिवासी व पिंपळगाव (हरेश्वर) येथील ग्राम विकास मंडळाचे माजी संचालक तथा वरसाडा तांड्याचे नाईक भंगलाल गोविंदा राठोड हे आपली दुचाकी (एमएच- २०, एजे- ५०००) ने पिंपळगाव हरेश्वरकडे जात हाेते. वरखेडी येथील शासकीय रुग्णालयासमोर ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार भंगलाल राठोड हे जागीच ठार झाले. ही माहिती समजताच वरखेडी येथील ग्रामपंचायत सदस्य योगेश चौधरी, शशिकांत पाटील, दिशेने पाटील, गोरख जाधव, समाधान भोई यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनास्थळी रुग्णवाहिका येईपर्यंत भंगलाल राठोड यांची प्राणज्योत मालवली होती. अपघाताची माहिती पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांना मिळताच सपाेनि महेंद्र वाघमारे यांनी हेड कॉन्स्टेबल रणजित पाटील व सहकाऱ्यांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले आहे.
सपाेनि महेंद्र वाघमारे यांनी हेड कॉन्स्टेबल रणजित पाटील व सहकाऱ्यांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले आहे.