बहिणीची भेट घेऊन घरी परतताना भावाचा अपघाती मृत्यू

मार्च 26, 2022 2:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२२ । बहिणीची भेट घेऊन घरी परतताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुणच्या 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री गाते रेल्वे स्थानकाजवळ घडली. ओम प्रकाश ढिवर (21) असे अपघातातील मृत तरुणाचे नाव असून या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, याप्रकरणी सावदा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात असून नातेवाईकांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

gate railway station accident

काय आहे घटना?
यावल तालुक्यातील शिरागड येथून बहिणीच्या घरून मेहुण जात असताना 11.30 वाजेच्या सुमारास गाते रेल्वे स्टेशनजवळील इस्सार पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यात ओम ढिवर याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केले जात असून नातेवाईकांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

रावेर ग्रामीण रुग्णालयात डॉ.अनिकेत चव्हाण यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. यावेळी रावेर पंचायत समितीचे माजी सभापती जितू पाटील, मेहुणचे माजी सरपंच विकास पाटील, बाजार समितीचे माजी सभापती श्रीकांत महाजन यांनी रावेर ग्रामीण रुग्णालयात भेट देत मृतकाच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now