⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | युवासेना सचिव वरूण सरदेसाई ३० मार्चला जळगाव दौऱ्यावर

युवासेना सचिव वरूण सरदेसाई ३० मार्चला जळगाव दौऱ्यावर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२२ । युवासेना सचिव वरुण सरदेसाई “युवासेना निश्चय दौऱ्या” निमित्त दि. ३० मार्च रोजी जळगाव दौऱ्यावर येत आहे. सकाळी १० वाजता शहरातील जिल्हा नियोजन भवन सभागृहात जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांना सिनेट निवडणुकी विषयी मार्गदर्शन करणार आहेत.

महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विद्यपीठ सिनेट निवडणूका युवासेना पूर्ण ताकदीने लढणार आहे. युवासेना प्रमुख ना.आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई विद्यापीठातील १० पैकी १० जागा मागे युवासेनेने जिंकल्या होत्या, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात युवासेना सिनेट निवडणूक लढवून विद्यार्थी हितासाठी भगवा फडकवण्यासाठी सज्ज आहे. जळगाव दौऱ्यावेळी युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या सोबत युवसेना कार्यकारीणी सदस्य अंकित प्रभू, युवासेना कार्यकारीणी सदस्या तसेच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्या शीतल देवरुखकर शेठ, युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव अविष्कार भुसे, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम, विस्तारक कुणाल दराडे, युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव विराज कावडीया, योगेश निमसे, विस्तारक किशोर भोसले आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार लता सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, हर्षल माने, समाधान महाजन, महिला जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे या सह तिघं जिल्ह्यातील शिवसेना व युवासेना पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहेत.

दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव विराज कावडीया, युवासेना जळगाव लोकसभेचे जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, रावेर लोकसभेचे जिल्हा युवाधिकारी चंद्रकांत शर्मा, पंकज राणे, महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, युवती सेनेच्या वैष्णवी खैरनार, जया थोरात, यशश्री वाघ आदी युवासैनिक परिश्रम घेत आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह