⁠ 
रविवार, मे 19, 2024

मुक्ताईनगर येथील “बीएसएनएल”चे कार्यालय महसुल प्रशासनाने केले सील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर येथील भारत संचार निगम लि.(बीएसएनएल) च्या कार्यालयाकडे तब्बल ३३ लाख १६ हजार ६०० रुपयाची थकबाकी पोटी मुक्ताईनगर तहसील कार्यालयातर्फे सील करण्याची कारवाई करण्यात आली. असून या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

शासकीय दुरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड च्या भ्रम्हणध्वनी मनोऱ्याचा अनधिकृत आकृषिक वापर सुरू असल्याबाबत सन २०१० ते सन २०१६ या कालावधीत अंतर्गत लेखा वसुली रक्कम १० लाख ८४ हजार ६०० रुपये व सन २०१६ ते सन २०२१-२२ या कालावधी दरम्यानची रक्कम २२ लाख ३२ हजार पर्यतची अशी एकुण ३३ लक्ष १६ हजार ६०० रुपये वसुली प्रलंबित आहे.तरी सझरची रक्कम ही २२ मार्च २०२२ पर्यत सरकार जमा न केल्याने महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे तरतुदीनुसार कार्यालय सील करण्याचे आदेश तहसीलदार श्वेता संचेती यांनी काढलेले होते. मात्र २२ मार्चपर्यत कोणत्याही प्रकारचा महसुल शासनाकडे जमा न झाल्याने सदर कारवाई तडकाफडकी करण्यात आली व कार्यालय सील करण्यात आली.

कारवाई प्रसंगी नायब तहसीलदार निकेतन वाळे, निवासी तहसीलदार प्रदिप झांबरे, मंडळ अधिकारी किशोर तायडे, तलाठी महादेव दाणे, सोमनाथ बोरटकर यांनी काम पाहिले.