एरंडोल नगरपालिका’तर्फे मालमत्‍ता कर न भरणाऱ्या करदात्यांवर कारवाई

मार्च 25, 2022 10:23 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२२ । एरंडोल शहरातील मालमत्ता कर व पाणीपट्टी कराच्या १००% वसुलीचे उद्दिष्ट पूर्ततेकामी मुख्या्धिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांनी आढावा बैठक घेऊन संपूर्ण शहरात थकबाकी वसुली करीता धडक कारवाई पथकांची नेमणूक केली. त्यानुसार शहरातील सीताराम भाई नगर, मास्टर कॉलोनी, पद्ममाई पार्क, पद्मालय नगर, ओम नगर येथील थकीत करदात्यांचे 30 नळ कनेक्शन बंद करण्या्त आले.

erandol 6 jpg webp

सदर थकीत कर दात्यांना कराची रक्कम भरण्याकरता वारंवार सूचना देऊन तसेच विनंती करून देखील भरणा न केल्यामुळे नळ कनेक्शन बंद करण्याची कटू कारवाई करण्यात आली. वसुली पथकाच्या कारवाई अंतर्गत आतापर्यंत सुमारे ४ लाख रक्कम वसुल करण्यात आली. कर वसुलीची उद्दिष्ट पूर्तीकरिता मोहीम अजून कडक करण्यात येणार असून त्यात नळ कनेक्शन बंद करणे, स्थावर मालमत्ता जप्त करणे अशी कारवाई हाती घेण्यात येत आहे. तसेच थकित करदात्यांना जप्तीच्या् नोटीसा बजावण्यात येत असून कराचा भरणा न केल्यास त्यांची नावे वर्तमानपत्रात प्रसिध्द करून न.पा.अधिनियमातील तरतुदी नुसार स्थावर मालमत्ता जप्त करून त्यांची जाहीर लिलावाव्दारे विक्री करण्यात येईल.

त्यामुळे करदात्यांनी ३१ मार्च च्या आत आपल्या‍ करांचा भरणा करावा व कटु प्रसंग टाळावा व न.पा.स सहकार्य करावे असे आवाहन एरंडोल न.पा.चे मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now