जळगाव लाईव्ह न्यूज । सादिक पिंजारी । ऐनपुर येथील घरगुती गॅस ग्राहक क्रमांक १५१३७ या ग्राहक क्रमांकास ऑनलाइन रिफिल बुकिंग करुन ही सिलेंडर न मिळताच ऑनलाइन सिलेंडर डिलीवरी तथा पोहोच अशी नोंद झाल्याचे दर्शवत आहे. आद्यापही ग्राहक सिलिंडरच्या प्रतीक्षेत असून याकडे रावेर येथील लक्ष्मी गॅस एजेंसीकडुन दुर्लक्ष होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, भारत गॅस कंपनीचे रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे घरगुती ग्राहक क्रमांक १५१३७ चे ग्राहक असून, दिनांक २३/०२/२०२२रोजी ग्राहक क्रमांक १५१३७ या क्रमांकाने आपल्या रजिस्टर मोबाइल क्रमांक-९८८१९६९६७९ ने आर्डर क्र.१६५७५७ या क्रमांकाने सिलेंडर बूकिंग केले होते परंतु बरेच दिवस झाल्याने सिलेंडर पोहोच झाले नसल्याने सदर घरगुती ग्राहक क्रमांकाच्या रेजिस्टर मोबाइल क्रमांकाने लॉग इन करुन स्टेटस चेक केले असता दिनांक २५/०२/२०२२ या ग्राहक क्रमांकावर रक्कम रुपये ९०४.५० इतके कैश ऑन डिलीवरी करुन कैश मेमो क्रमांक १६३९६१ सिलेंडर पोहोच तथा डिलिवर्ड झाल्याची नोंद झाल्याचे समजले,परंतु प्रत्यक्षात ग्राहकास ते अद्यापहि मिळालेले नाही,याची तोंडी तक्रार रावेर येथील लक्ष्मी गैस एजेंसी कड़े केली असता “आम्ही बघतो स्ट्रेस लावतो की काय प्रकार आहे” असे सांगण्यात आले, असे सांगण्यात आले परंतु तोंडी तक्रार केल्यानंतर ही १८ ते २० दिवस उलटुनही काहीच झाले नाही, म्हणून ग्राहकाने याबाबत लक्ष्मी गॅस एंजेंसी रावेर आणि रावेर तालुका पुरवठा अधिकारी यांना दिनांक २१/०३/२०२२ रोजी लेखी तक्रार दिली आहे.
सिलेंडर बुकिंग करूनही सिलेंडर बुकिंग केलेल्या ग्राहकास न मिळताच पोहोच ची नोंद झालीच कशी? बुकिंग केलेले सिलेंडर ग्राहकास न मिळता एजंसी कडुन कुणाला देण्यात आले? एजंसी कडुन जर वितरकाकडे दिले तर वितरकाने सिलेंडरची विल्हेवाट लावली कुठे? यामागे काही गौड़ बंगाल तर नाही न? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे, अश्या प्रकाराबाबत तालुक्यातील पुरवठा अधिकारी यावर काय कार्यवाही करणार याकडे लक्ष लागुन आहे.