धक्कादायक ! १५ वर्षीय अल्पवयीनला पळवून नेत केला अत्याचार

मार्च 22, 2022 5:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२२ । जामनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आलीय. तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. त्यानंतर या मुलीवर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

rape jpg webp

काय आहे नेमका प्रकार

याबाबत असे की, जामनेर तालुक्यातील एका गावात 15 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला असून गावातील एका तरुणाने तिला घरातून फूस लावुन पांढऱ्या गाडीत पळवून नेले. त्यानंतर एका गावाजवळील रस्त्यावर थांबून गाडीतच तिच्यावर अत्याचार केला.

यासंदर्भात पिडीत मुलीने पहूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now