जळगाव शहर

भारतीय संस्कृतीचे जतन हेच आनंदी कुटुंबाचे सार- डॉ. स्मिता जोशी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२२ । भारतीय संस्कृती ही जगात महान आहे. तिचे विविध पैलू हे जीवनातील चढ- उतार, संकटे- अडचणी यांना सामोरे जाण्याची प्रेरणा आपल्याला देतात हे आनंदी कुटुंबाचे सार आहे. त्यामुळे आज प्रत्येकाने या संस्कृतीचे जतन करावे असे विचार शहरातील कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक डॉ. स्मिता जोशी यांनी महिला मेळाव्यात मांडले.

शहरातील संत नरहरी सोनार बहुद्देशीय संस्था मेहरून, जळगाव संचालित वाघेश्वरी महिला मंडळातर्फे नुकताच राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ज.श.म.न.पाच्या महापौर जयश्री महाजन, अध्यक्षस्थानी सरस्वती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पूजा पातोंडेकर, रंजना वानखेडे, नगरसेविका वैशाली विसपुते, लतामोरे सामाजिक कार्यकर्त्या सरिता माळी, दापोरेकर ज्वेलर्सच्या विद्या दापोरेकर, शोभा चौधरी, निर्मला बागुल, डॉ. ज्योती गाजरे, ह.भ.प कीर्तनकार गायत्री दुसाने आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना त्या म्हटल्या की सध्या समाजात घटस्पोट, कुटुंबातील कलह त्यातून टोकाला जाणारे वाद हे सर्व मन खिन्न करणारे आहे हे वाद टाळता यावे यासाठी पती -पत्नी या दोन्हीपैकी एकाने सामंजस्य याची भूमिका घ्यावी जेणेकरून कुटुंबात कलह कमी होतील. असा मोलाचा सल्ला देखील त्यांनी उपस्थित महिलांना दिला. या प्रसंगी डॉ. ज्योती गाजरे यांनी महिलांना निरोगी जीवनशैली याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच गायत्री दुसाने यांनीही महिलांना “स्त्री शक्ती व आध्यत्मिकता यावर मनोगत व्यक्त केले.
महिला मंडळाचा हा पहिलाच उपक्रम होता यात लहान मुले-मुली यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

प्रास्ताविक ऍड. केतन सोनार यांनी केले. सूत्रसंचालन वर्षा अहिरराव तर आभार जगदीश देवरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी मंडळाच्या प्रमिला चव्हाण, पूजा सोनार, नयना सोनार, निर्मला देवरे, मीना वाघ, दिपाली बिरारी, मनीषा सोनार, ज्योती सोनार,सुनीता देवरे,भारती पोतदार,आदींनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा:

Related Articles

Back to top button