सोशल मीडियावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा अवमान करणाऱ्या विरुद्ध गुन्हा नोंदवा

मार्च 22, 2022 12:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२२ । महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे व राष्ट्रीय नेते असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या फोटोचे विडंबन करून आढळ मावशी व मौलानांचा चेहरा व इतर चेहरे लावुन तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहि फोटोचे विद्रुपीकरण करून वेगवेगळ्या कॉमेंट्स फेसबुक वर पाठवणारे हेमंत डोलारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी गुन्हा नोंदविण्यात यावा, असे निवेदन जळगाव महाविकास आघाडीतर्फे जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला देण्यात आले.

nevedan

हेमंत डोलारे जळगाव येथील रहिवासी असून नेहमीच व अनेक दिवसापासून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते उद्धवजी ठाकरे, शरदचंद्र पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, अजित पवार, सुप्रिया सुळे व देशातील इतर नेत्यांच्या बाबतीत उपरोधिक टीका टिप्पणी करून त्यांच्या चेहऱ्यांचे विद्रुपीकरण करून देशातील व समाजातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करून एका विशिष्ट राजकीय पार्टीचे समर्थन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षांची बदनामी करून चुकीची प्रतिमा समाज माध्यमात पसरवित असतात. त्यांच्या या बेताल वागण्याने समाजात तेढ निर्माण होत असुन, राजकीय व सामाजिक वातावरण गढूळ करण्याचे काम हेमंत डोलारे हे करीत आहेत.

त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी गुन्हा नोंदविण्यात यावा, असे निवेदन जळगाव महाविकास आघाडीतर्फे जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व सायबर क्राईम सेल जळगावचे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांना देण्यात आले. सदर निवेदन देतांना शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महानगराध्यक्ष शामकांत तायडे, शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष सुशीलकुमार शिंदे, माजी नगरसेवक राजू मोरे, डॉ. रिजवान खाटिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर उपाध्यक्ष अमोल कोल्हे सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा:

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now