कोरपावली येथे गोदावरी फाउंडेशनच्या विद्यमाने भव्य निशुल्क महाआरोग्य शिबीर
जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । दि.24 वार गुरुवार रोजी सकाळी 10 ते 3 वाजेदरम्यात जिप मराठी मुलांची शाळा येथे आयोजित करण्यात आले असून सदर शिबिराचे उदघाटन जिप गटनेते प्रभाकर नारायण सोनवणे यांच्या हस्ते होणार असून सदर कार्यक्रमाला गोदावरी फौंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, यावल बाजार समितीचे सभापती नितीन चौधरी उपस्तित राहणार असून
सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष भैय्यासाहेब संदीप सोनवणे, शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरुड, कोरपावलीचे सरपंच विलासभाऊ अडकमोल, उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल, महेलखेडीच्या सरपंच शरिफा तडवी, उपसरपंच माया महाजन, कोरपावली व महेलखेडी ग्रापचे सर्व सदस्य आणि गावातील परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार असून परिसरातील जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान मुख्यआयोजक माजी सरपंच जलील पटेल, समाजसेवक मुक्तार पटेल, उमेश जावळे, भरत चौधरी, ग्राप सदस्य आरिफ तडवी, माहेलखेडी ग्राप सदस्य जयंता पाटील, अशोक तायडे आदींनी केले आहे.
हे देखील वाचा:
- Yawal: मीटरमध्ये छेडछाड, यावलमधील ‘या’ गावातील महावितरणने ५० मीटर घेतले ताब्यात..
- Gold Rate : जळगावच्या सुवर्णपेठेत एकाच दिवसात सोने-चांदी दरात मोठी वाढ, भाव वाचून फुटेल घाम
- गोदावरी अभियांत्रिकीत स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन उत्साहात
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले