१५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले, गुन्हा दाखल

मार्च 21, 2022 2:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२२ । जळगाव तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी संशयित आरोपी भुषण कोळी (रा. डांभूर्णी ता. यावल) यांच्याविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime (1)

जळगाव तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १८ शुक्रवार १८ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी होती. दरम्यान, संशयित आरोपी भुषण तुकाराम कोळी रा. डांभुर्णी ता. यावल याने तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीचे वडील यांनी दिली आहे.

त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू अल्पवयीन मुलगी कोठेही आढळून आली नाही. अखेर त्यांनी रविवारी २० मार्च रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी भुषण कोळी रा. डांभूर्णी ता. यावल याच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now