जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२२ । चाळीसगाव शहरातील साईनगर विमानतळ भागात राहणारा चेतन शिवराम थोरात (वय ३५) या तरुणास अपघातात जखमी होऊन मृत अवस्थेत दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीच्या अकस्मात मृत्यूची नोंद चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
चेतन शिवराम थोरात या अपघात झाल्याने जखमी अवस्थेत त्याचे नातेवाईक संजय ठाकरे यांनी चाळीसगाव रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, रस्त्यातच चेतन थोरात याचा मृत्यू झाले असल्याचे निदान चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांनी केले.
त्यानुसार वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात रजिस्टर नोंद क्रमांक १४/२०२२-सीआरपीसी कलम १७४ नुसार पो. हे. पा. अजय सुकराम मालचे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पो. ना. संदीप माने हे करीत आहेत.