⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | चोपडा | धानोरा येथून सतपंथ पदयात्रा रवाना

धानोरा येथून सतपंथ पदयात्रा रवाना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । चोपडा तालुक्यातील धानोरा येथून आज दि.19 मार्च रोजी सकाळी १० वाजता सतपंथ ज्योत मंदिर धानोरा आयोजित धानोरा ते पिरणा (गुजरात) येथे सतपंथ धर्माची पदयात्रा रवाना झाली. या पदयात्रेत एकूण अंदाजे 100 भाविकांनी सहभाग घेतला होता. हि पदयात्रा सुमारे 600 किलोमीटरचे अंतर पायी चालत पार केली जाते व ठीकठिकाणी पदयात्रेतील भाविकांसाठी जेवण व चहापाण्याची व्यवस्था दात्यांकडून करण्यात आलेली असते.

या पदयात्रेचे एकूण 15 मुक्काम होत असतात. या वर्षी या पदयात्रेचे 13 वे वर्ष असून हि पदयात्रा संपूर्ण परिसरातून जास्त अंतर चालणारी असल्याने हि प्रसिध्द आहे म्हणून हि पदयात्रा पाहण्यासाठी समस्त गावकऱ्यासहित परिसरातील आबालवृद्ध मंडळींची चांगलीच गर्दी पाहायला येते.

पदयात्रेला जगद्गुरू ज्ञानेश्वरदासजी महाराज पिराणा (गुजरात) व फैजपूर येथील सतपंथ रत्न आचार्य महामंडलेश्वर श्री1008 स्वामी जनार्दन हरी जी महाराज यांचे मार्गदर्शनात पदयात्रा रवाना होते.

पदयात्रेत वाजत गाजत पालखी व रथ रुपी मोटारगाडी वर भव्य रथावर श्री निष्कलंकी नारायण व श्री सदगुरू इमामशहा महाराज यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या तसेच या पदयात्रींना निरोप देण्यासाठी गावातील आबालवृद्ध नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती संपूर्ण गाव भक्तिमय झाले होते. 15 दिवस चालणाऱ्या या पदयात्रेचा समारोप दि.2 एप्रिल गुढीपाडवा रोजी प्रेरणा पीठ पिरणा (गुजरात) या ठिकाणी समाप्त होतो. पद्यात्रेच्या यशस्वीतेसाठी सतपंथ ज्योत मंदिर, मुखी विजय महाराज,मुखी मनोहर महाराज,मुखी ईश्वर महाराज,मुखी केशरलाल महाराज,मुखी कमलाकर महाराज,मुखी धनराज महाराज व सर्व सतपंथी बंधू -बघिनी समाजबांधव व गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.