खडसेंच्या पुनरोच्चार : सीडी योग्य वेळ आल्यावर बाहेर काढणार
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२२ । ‘तुम्ही ईडी लावा मी सीडी लावतो’ या विधानावरून गेल्या काही दिवसापासून माजी मंत्री एकनाथराव खडसेंना ट्रोल केले जात आहे. दरम्यान, आज मुंबई बोलताना खडसेंनी पुन्हा सीडीचा पुनरुच्चार केला आहे. आपल्याकडे सीडी असून योग्य वेळ आल्यावर सीडी बाहेर काढेल असे खडसेंनी म्हटले आहे. अद्याप योग्य वेळ आली नसल्याचे त्यांनी सांगितले.
काय म्हणाले नेमकं खडसे?
पेनड्राईव्ह प्रकरणात दिलीप वळसे पाटील हे दूध का दूध पाणी करतीलच. दाऊदशी संबंध जोडल्याने प्रसिद्धी मिळते. त्यामुळे माझ्यावरही अनेक आरोप झाले होता. त्याचे काय झाले? हे सगळ्यांना महित आहे. माझे आणि संजय राऊत यांचे फोन टॅपिंग केले गेले. याबाबत आज कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये चौकशी झाली आहे. दरम्यान, माझा फोन टॅपिंग झाले याबाबत मी गृह सचिवांना कळविले होते.
नाथाभाऊंची त्यावेळी भीती वाटली असेल म्हणून फोन टॅपिंग झाले होते असेही खडसे म्हणाले. राज्यपाल महोदयांना 12 आमदारांच्या निवडीचा अधिकार आहे. न्यायालयाने निकाल दिला. त्यांनी आता 12 आमदारांची नियुक्ती करावी. देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी काय प्रश्न विचारले याची माहिती फडणवीसच देऊ शकतील असही ते म्हणाले. दरम्यान, प्रफुल्ल लोढा हा गिरीश महाजनांचा कार्यकर्ता असल्याचेही खडसे म्हणाले. दरम्यान, माझी सीडी बाहेर येणार आहे. आता सीडी बाहेर काढून काय निवडणुकीवर परिणाम होणार नाही. वाट बघा, असे खडसे पुण्यात फेब्रुवारी महिन्यात म्हटले होते.
पहा काय म्हणाले खडसे :