जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२२ । शहरातील मुख्य रस्त्यांवरील इमारतींच्या बेसमेंटचे अतिक्रमण काढण्यासाठी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पाठपुरावा केला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून ते या विषयाची माहिती घेत होते. अखेर प्रत्यक्ष कारवाईची वेळ येऊन ठेपली असून
जळगाव शहरात अनेक मालमत्ता धारकांनी अनधिकृतपणे पार्किंगच्या जागी बेसमेंटमध्ये अतिक्रमण केले आहे. उपमहापौर पदाचा पदभार स्वीकारल्यापासून कुलभूषण पाटील हे अनधिकृत बेसमेंटवर कारवाईसाठी आग्रही होते. काही दिवसांपूर्वी मनपा प्रशासनाकडून महात्मा गांधी मार्गावरील मालमत्तांचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. मनपा प्रशासनाकडून महात्मा गांधी मार्गावरील २९ मालमत्तांचे सर्व्हेक्षण करून सर्वांना नोटीस बजावली होती.
मनपाच्या नोटीसनंतर मालमत्ताधारकांकडून आलेल्या खुलासा आणि कागदपत्रानुसार २ बेसमेंट अधिकृत झाले आहेत. तसेच उर्वरित २७ मालमत्ताधारकांच्या सुनावणी घेतल्या जात असून आज १३ आणि उद्या १३ मालमत्ताधारकांची सुनावणी होणार आहे. शहरातील रस्त्यांवर योग्य पार्किंग उपलब्ध झाल्यास रस्ते मोकळा श्वास घेतील. प्रत्यक्ष कारवाईला लवकरच सुरुवात होईल असे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सांगितले.