जळगाव लाईव्ह न्यूज । सादिक पिंजारी । रावेर तालुक्यातील शेत शिवारात शेतकऱ्यांच्या शेतातील पिके निघाल्यानंतर मेंढ्या चारण्यासाठी मेंढपाळ भर उन्हात जिवाचे रान करताना असतात तसेच एक चित्र खिर्डी परिसरात दिसुन आले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही या परिसरात अनेक ठिकाणी मेंढपाळांचा मुक्काम दिसून येत आहे. वर्षातून पाच ते सहा महिने या मेंढपाळांची मेंढ्या चारण्यासाठी भटकंती सुरू असते. सध्या आता कडकडाक्याच्या उन्हात मेंढपाळ या परिसरातील शेतांमध्ये चाऱ्यांचा शोधात शेतकऱ्यांनी शेतातील पिके काढल्यावर रिकाम्या शेतात अनेक ठेलारी, मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारण्यासाठी दरवर्षी रावेर तालुक्यात व गावागावात येत असतात या भागात शेती शिवाराच्या परिसरात पाण्याची सोय असेल तिथे मोकळ्या शेतात आपले संसार थाटतात असुन जेथे चारा सापडेल त्या शिवारात मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारत असतात व शेतकरी आपल्या शेतात लेंडी खत आणि मूत्र मिळावे म्हणून मेंढपाळांना मेढ्या मुक्काम ठेवण्यासाठी पाचशे ते सहाशे रुपये देऊन किंवा केवळ चराईवर शेतात मेंढ्या बसवत असतात. तसेच या परिसरात मेंढपाळाचा मुक्काम राहत असल्याचे चित्र सध्या आपणास दिसून येत आहे.










