जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२२ । भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे, भुसावळ शाखेची बैठक नुकतीच संपन्न झाली. ज्यात १९ एप्रिलला सामूहिक विवाह सोहळा आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. असून या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी विवाहेच्छुकांनी नोंदणी नोंदणी कारण्यासाठी भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेचे कार्यालय, पुरुषोत्तम मेडिकल जामनेर रोड येथे संपर्क साधावा असे आवाहन उपक्रमाच्या चेअरमन आरती चौधरी यांनी केले.

या सोहळ्यात वैदिक पद्धतीने विवाह होतील, तसेच जोडप्यांना संस्थेतर्फे गॅस शेगडी सिलिंडर, मिक्सर, कुकर, संसारोपयोगी साहित्य, पैठणी व ड्रेस भेट म्हणून दिले जाणार आहे. या बैठकीला कुटुंब नायक रमेश पाटील, अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव बाळू पाटील, सुहास चौधरी, परीक्षित बऱ्हाटे, नीळकंठ फालक, महेश फालक, मंगला पाटील, डिगंबर महाजन, शरद फेगडे, रघुनाथ चौधरी आदी उपस्थित होते.








