डॉ. वैष्णवी महाजन यांचा शिवसेनेतर्फे गौरव

मार्च 13, 2022 3:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२२ । पाचोरा शहरातील रहीवाशी स्वातंत्र्य सैनीक व पाचोरा नपा माजी ऑक्ट्रॉय इन्स्पेक्टर स्व. दामोदर लोटन महाजन यांची नातू ध्येय करिअर ऍकेडमीचे संचालक संदीप महाजन आणि पाचोरा गो. हायस्कुलच्या इंग्रजी विषयाच्या उपशिक्षीका शितल महाजन यांची मोठी कन्या डॉ. वैष्णवी संदीप महाजन हिने पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मधुन गणितात पदवी तर M.Sc तसेच B.Ed यश प्राप्त करून गणित विषयात तिने J.J.T.U. येथुन Certain Investigations On Algebraic Structure Of Groups And Rings या विषायात संशोधन करून वयाच्या 26 वर्षी Ph.D. प्राप्त केली. त्याबद्दल आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गणित विषयात पाचोरा शहर व तालुक्यातुन प्रथम तर उत्तर महाराष्ट्रात सर्वात कमी वयात Doctorate होणारी Ph.D प्राप्त करणारी पहीली व्यक्ती ठरली आहे.

shivsena 3 jpg webp

डॉ. वैष्णवी हल्ली पाचोरा येथील शेठ एम.एम.कॉलेज मध्ये सिनीअर कॉलेजला गेल्या तिन वर्षा पासुन मॅथ विभागाचे HOD म्हणुन कार्यभार सांभाळत आहे. यावेळी शिवसेना जि.प.गटनेते रावसाहेब पाटील, जि.प.सदस्य उद्धव मराठे, शिवसेना तालुका प्रमुख शरद पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उद्योजक मुकुंद बिलदीकर, नगरसेवक सतीश चेडे , नगरसेवक राम केसवाणी आदी शिवसेना पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now