जळगाव जिल्हाजळगाव शहर
सात दिवसीय योग शिबिराचा समारोप, मू.जे.’चा’ उपक्रम
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२२ । मुळजी जेठा महाविद्यालय अंतर्गत सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँन्ड नेचरोपेथिच्या एमए योगिक सायन्स अभ्यासक्रम अंतर्गत योग शिक्षिका पूजा सतीश उभाळे आणि कोमल राजेंद्र ठाकूर यांचे 7 दिवसीय निःशुल्क योग शिबिर बालसुधारगृह येथे बाल कल्याण समितीच्या परवानगी’ने प्रारंभ करण्यात आले.
4 मार्च ते 10 मार्च सायंकाळ 5 ते 6 या वेळेत सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँन्ड नेचरोपेथिचे संचालक डॉ. देवानंद सोनार, प्रा.पंकज खाजबागे, प्रा. गीतांजली भंगाळे, प्रा. अनंत महाजन या 7 दिवसात मार्गदर्शन केले. समारोप प्रसंगी बालसुधारगृह कर्मचारी व प्रशासन अधिकारी उपस्थित होते. शिबिर घेण्यामागे विद्यार्थांना आरोग्य दृष्टीने विकास हा हेतू होता. संपुर्ण मोफत प्रशिक्षण देणाऱ्या योग शिक्षिका पूजा सतीश उभाले आणि कोमल राजेंद्र ठाकूर यांचे कौतुक होत आहे.