⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | गुलाबरावांची आठवलेंवर जहरी टीका, ..त्यांचाच पक्ष भाजपच्या दावणीला बांधलाय!

गुलाबरावांची आठवलेंवर जहरी टीका, ..त्यांचाच पक्ष भाजपच्या दावणीला बांधलाय!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२२ । केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी शिवसेनेबाबत केलेल्या वक्तव्याचा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आठवले म्हणजे भाजपचे कुणी निर्णायक नेते नाहीत. त्यांनी बोलण्याआधी भाजप तसेच शिवसेनेच्या नेत्यांची परवानगी घ्यावी. आठवले यांचाच पक्ष भाजपच्या (bjp) दावणीला बांधलेला आहे. ते काय शिवसेनेच्या भविष्यावर बोलतील, अशी खरमरीत टीका गुलाबराव पाटलांनी केली.

गुलाबराव पाटील जळगावमध्ये मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मीडियाच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी रामदास आठवले यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला.

गुलाबराव पाटील म्हणाले, आठवले म्हणजे भाजपचे कुणी निर्णय घेणारे नेते नाहीत. त्यांनी असे विधान करण्यापूर्वी भाजप तसेच शिवसेनेच्या नेत्यांची परवानगी घ्यावी. त्यांचे विधान अत्यंत चुकीचे आहे. आठवलेंसारख्या नेत्यांना असे विधान करणे शोभणारे नाहीत. 

तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी जळगावच्या तेजस मोरेचे नाव घेतल्याने याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने त्यावर बोलणे उचित होणार नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याबाबत विधानसभेत सोमवारी खुलासा करणार आहेत. त्यानंतर याप्रकरणातील नेमके सत्य काय ते बाहेर येईल. म्हणजेच दूध का दूध पानी का पानी होईलच, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

काय म्हणाले होते आठवले?

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले शिवसेनेबाबत नुकतीच भविष्यवाणी करत टीका केली होती. ते म्हणाले होते की, “शिवसेना स्वबळावर लढली तर शिवसेनेचे तीन चार खासदारही निवडून येणार नाही. शिवसेनेची परिस्थिती काँग्रेससारखी झाली आहे. 

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.