रावेरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त उत्सव समिती स्थापन
जळगाव लाईव्ह न्यूज । दिपक तायडे । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंती निमित्त रावेर शहरात उत्सव समिती गठीत करण्यात आली. ज्यात अध्यक्षपदी पंकज वाघ, सचिवपदी दिपक तायडे तर कोषाध्यक्षपदी अमर तायडे यांची निवड
करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती उत्सव समिती स्थापन करण्यासाठी १० रोजी आंबेडकर नगर येथे आयु.बाळू शिरतुरे यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. ज्यात अध्यक्षपदी पंकज वाघ, उपाध्यक्षपदी मिलिंद अवसरमल, सचिवपदी दिपक तायडे, सहसचिवपदी सिद्धार्थ शिरतुरे, कोषाध्यक्षपदी अमर तायडे, सहकोषाध्यक्षपदी अमोल तायडे, सदस्यपदी अविनाश इंगळे, प्रकाश अडकमोल, बंटी अटकाळे तर सल्लागार पदी मुरलीधर तायडे, आनंद बाविस्कर, दिलीप कांबळे, बाळू शिरतुरे, महेंद्र गजरे, जगदीश घेटे, दिपक नगरे संघरत्न दामोदरे, ऍड. योगेश गजरे,राजेंद्र अटकाळे, जे. व्ही. तायडे, रमण तायडे, संघरक्षक तायडे, गोविंद लहासे, बाळू तायडे, एल.डी.निकम,पिंटू वाघ , अशोक वाघ, देवेंद्र सोनवणे, पुंडलिक कोंघे अशी समिती गठित करण्यात आली.