खासदार रक्षा खडसेंची खिर्डी येथील श्रीकृष्ण मंदिर संस्थानला भेट

मार्च 11, 2022 3:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सादिक पिंजारी । रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द येथील सुप्रसिद्ध असलेले श्रीकृष्ण मंदिर संस्थानला खासदार रक्षा खडसे यांनी भेट दिली. यावेळी देवाला विडा अवसर समरपण करण्यात आला. तसेच मंदिराच्या कामाबद्दल चर्चा झाली.

templ jpg webp

मंदिराचे मठाधिपती नरेंद्र महाराज यांनी खासदार रक्षा खडसे यांना भक्तांसाठी भक्तनिवास आपल्या खासदार निधीतून करून द्यावा, असा प्रस्ताव मांडला असता कोरोना काळापासून खासदार निधी बंद झाला असून निधी सुरू झाल्यास मंदिरासाठी प्रयत्न करणार असल्याची दिली.

यावेळी गावातील महानुभव मंडळी मंजुषा महाजन, पुष्पा नारखेडे, मधुकर महाजन, सुधाकर महाजन, प्रभाकर महाजन, मिराबाई महाजन, कोमल चौधरी, विलास पाटील, प्रवीण सेलोडे, संस्थानचे मठाधिपती नरेंद्र महाराज, प्रदीप महाराज, नंदकिशोर महाजन, श्रीकांत महाजन, महेश चौधरी, नितीन पाटील आदी भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now