जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२२ । केसीई सोसायटीच्या एकलव्य क्रीडा संकुलातील एकलव्य जिम्नॅस्टिक्स ऍकॅडमीमध्ये सराव करणारे ८ खेळाडू दि. ५ ते ६ मार्च २०२२ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे झालेल्या एरोबिक जिम्नॅस्टिक्स राज्य स्पर्धेत सहभागी झाले होते. हि स्पर्धा नॅशनल डेव्हलपमेंट, एज ग्रुप, ज्युनिअर व सिनीअर अशा चार गटात झाली. यात एकलव्य जिम्नॅस्टिक्स ऍकॅडमीच्या खेळाडूंनीएज ग्रुप व ज्युनिअर वयोगटात ८ पदके पटकावली. यात २ रौप्य व ६ कांस्य पदकांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे एकलव्य जिम्नॅस्टिक्सची खेळाडू साची इंगळे हीचा महाराष्ट्र राज्य एरोबिक जिम्नॅस्टिक्स तांत्रिक समितीद्वारे एज ग्रुप वयोगटात उदयोन्मुख खेळाडू म्हणून विशेष गौरव करण्यात आला.

या संघामधील खालील खेळाडूंनी विशेष यश मिळवले.
ग्रुप : साची इंगळे व उत्कर्ष सोनार (रौप्य पदक: मिश्र दुहेरी) अनुष्का चौधरी, साची इंगळे, उत्कर्ष सोनार, कृष्णाई रेंभोटकर व गायत्री देशपांडे (कांस्यपदक: मिश्र समूह)
ज्युनिअर: पाणिनी देव (कांस्यपदक: पुरुष एकेरी) या संघासोबत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रा. निलेश जोशी व प्रा. प्रविण कोल्हे यांनी जबाबदारी सांभाळली. या यशाबद्दल केसीईसोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, राज्य संघटना उपाध्यक्ष प्रविण पाटील, डॉ. रणजीत पाटील, अक्षय सोनवणे व पालकांनी खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.







