जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष फैजान अब्दुल गफ्फार शाह यांचा यावल तालुका व शहर काँग्रेसतर्फे सत्कार करण्यात आला.

यावल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जि.प.चे गट नेते प्रभाकर सोनवणे यांनी फैजान शाह याना बहु मताने विजय झाल्या बद्दल अभिनंदन व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पक्षांनी प्रतेकांना कार्यकारणी मध्य पदे दिलेले आहेत. मारुड येथे मुदासन झर यांना उपाध्यक्ष आणि फैजपूर येथे जावेद जनाब यांना महासचिव पदे मिळाली त्यांचंही अभिनंदन सोनवणे यांनी केले.

यावेळी वडोदे चे सरपंच संदीप सोनवणे, शेतकी संघाचे संचालक अमोल भिरुड, नगरसेवक मनोहर सोनवणे, तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, शहर अध्यक्ष कादिर खान, शहर उपाध्यक्ष अनिल जंजाले, नईम शेख, विक्की गाजरे, अश्फाक शाह, शेख सकलेन आदी उपस्थित होते.







