राज्यस्तरीय महाजिवीका अभियानाचा खासदार रक्षा खडसे व खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२२ । महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगांव’ तर्फे “उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभिया”चा राज्यस्तरीय शुभारंभ खासदार रक्षा खडसे व खासदार उन्मेष पाटील, जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्ह्यातील महिला उद्योजिकांसाठी आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात येऊन. यावेळी अभियानाच्या माध्यमातुन निर्माण झालेल्या समुदाय स्तरीय संस्था व त्यांच्या सदस्यांना शाश्वत उपजीविकेचे स्त्रोत निर्माण व्हावेत यासाठी ग्रामीण भागातील महिला बचत गटांद्वारे उत्पादित केलेल्या मालास हक्काची बाजार पेठ मिळवून देण्यासाठी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगांव यांच्या मार्फत ‘मुक्ताई’ या ब्रँड खाली महिला बचत गटांच्या निवडक उत्पादन वस्तूंची सुची प्रकाशित करण्यात येऊन, “उमेद” अभियानाच्या दशसुत्रीनुसार उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक मिनल कुटे, सेन्ट्रल बँकेचे के.के.सिंग, वस्तु व सेवाकर उपायुक्त एम.एल.पाटील, पोखरा समन्वयक संजय पवार, विद्यापीठ संचालक भुषण चौधरी आदी उपस्थित होते.