महिला सबलीकरण होणं अत्यंत आवश्यक : दिगंबर कट्यारे

मार्च 8, 2022 6:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२२ । जागतिक महिला दिनानिमित्त अध्यापिका महाविद्यालय जळगाव येथे
अंधश्रद्धा निर्मूलन समिती व मराठी विज्ञान परिषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी महिला सबलीकरण होणं अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन दिगंबर कट्यारे जिल्हा कार्याध्यक्ष जळगाव यांनी केले.

schoole 2 jpg webp

मराठी विज्ञान परिषदेचे सचिव प्रा.दिलीप भारंबे यांनी प्रयोगातून विज्ञान सादरीकरण केले.त्यात त्यांनी वेव्ह थेअरी, सायफन पद्धत, सेंटर ऑफ मास हे प्रयोग दाखवून त्यामागिल विज्ञान स्पष्ट केले. दिगंबर कट्यारे यांनी हातातून रक्त काढणे, कलशातून अखंडपणे पाणी बाहेर काढणे, सुई जिभेतून आरपार काढणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भूत भानामती करणी याविषयीची भीती दूर करण्यासाठी विद्यार्थीनींनी जळका कापूर खाण्याचा चमत्कार सादर केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा.लिना महाजन यांनी केले. भोळे व चव्हाण यांनी सहकार्य केले. प्राचार्या सुवर्णा चौधरी यांनी मार्गदर्शन केले. आभार भोळे मॅडम यांनी मानलेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now