जळगाव जिल्हाशैक्षणिक
त्र्यंबकनगर प्राथमिक विद्यामंदिर शाळेत जागतिक महिला दिन साजरा
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२२ । त्र्यंबकनगर प्राथमिक विद्यामंदिर शाळेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी यशस्वी महिला म्हणून दंतरोग तज्ञ डॉ.निलम किनगे यांचा सत्कार करण्यात आला.
दातांची घ्यावयाची काळजी याविषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या महिला शिक्षिकांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन उपशिक्षक निलेश मोरे यांनी केले. मुख्याध्यापक संजय भोळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्षा भोळे, चैताली पाटील, रेखा बारसे, चंद्रकांत अत्तरदे, जितेंद्र ठाकूर यांनी प्रयत्न केले. अमिता महाजन यांनी आभार व्यक्त केले.