जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२२ । सध्या अनेक डॉक्टरांनी रुग्नसेवा हीच ईश्वरसेवा हे बिद्रवाक्य विसरल्याचं चित्र पाहायला मिळत. मात्र, रावेर येथील महिला डॉक्टरांनी या बीद्रवाक्याला जागून गरजू रुग्णांवर तातडीने उपचार केले. या तातडीच्या उपचारामुळे अपघात ग्रस्त तरुणाचे प्राण वाचले. तुळशीराम सुभाष सावळे (वय ४५, रा. कर्जोद) असे जखमी युवकाचे नाव आहे.

महिला डॉक्टरांचा कौतुक

महिलादिनाच्या पुर्वसंध्येला रावेर शहरातील माऊली हॉस्पिटलच्या महिला डॉ. योगीता पाटील या डॉ.संदीप पाटील यांच्यासोबत खाजगी कामानिमित्त मध्यप्रदेशातील बहाणपूर येथे आपल्या खाजगी वाहनाने जात होत्या. तालुक्यातील खानापूर येथील उड्डाणपूलाजवळ एक इसम रस्त्यावर पडलेला दिसून आला. त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो बेशुध्दावस्थेत पडलेला होता. त्या ठिकाणी कुणीही थांबत नसल्याने महिला डॉक्तरांनी स्वतःचे वाहन थांबवून डॉ. संदीप पाटील यांच्या मदतीने वाहनात असलेल्या प्रथमोपचार साहित्याने जखमी रूग्णावर उपचार करण्यास सुरूवात केली. डॉक्टरांच्या गाडीत नेहमीच अत्यावश्यक इंजेक्शन व साहित्य असल्याने त्यांनी योग्यवेळी योग्य उपचार रूग्णावर करून रूग्णवाहिकेव्दारे रूग्णास रावेर येथील ग्रामीण रूग्णालयात रवाना केले. महिला दिनाच्या पुर्व संध्येला महिला डॉक्टरांकडून वेळीच उपचार मिळाल्याने रूग्णाचे जीव वाचल्याने डॉक्टरांचे परिसरात कौतुक होत आहे.









