महाराष्ट्र

Video : फडणवीसांच्या भाषणादरम्यान गिरीश महाजनांना लागली डुलकी, अन्… सभागृहातला व्हीडिओ व्हायरल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२२ । सध्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून काल विविध मुद्द्यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस मोठ्या जोशाने भाषण करत महाविकास आघाडीवर टीका करत असतानाच त्याचवेळी त्यांच्या मागील बाकावर बसलेले भाजपाचे नेते गिरीश महाजन डुलकी घेताना दिसले.

ही गोष्ट त्यांच्या शेजारीच बसलेल्या भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या लक्षात आली. तेव्हा आशिष शेलार यांनी बसल्या जागेवरून हळूच गिरीश महाजन यांना धक्का मारला. तेव्हा गिरीश महाजन यांनी खडबडून जागे होत सत्ताधाऱ्यांच्या दिशेने पाहत थेट हातवारे करायला सुरुवात केली.

देवेंद्र फडणवीस काय बोलतात, ते ऐकून तरी घ्या, अशा गिरीश महाजन यांचा एकूण आविर्भाव होता. डुलकीतून सावरल्यानंतर जणू काही झालेच नाही, असे गिरीश महाजन यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रसंग नेमका कॅमेऱ्यात टिपला गेला. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या व्हीडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या मुद्दावर आणि ओबीसी आरक्षणावरून विरोधक पहिल्या दिवसापासून आक्रमक आहेत. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस सातत्याने सत्ताधारी महाविकास आघाडीवर हल्लाबोल करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button