जळगाव जिल्हारावेर

वाघोदा ग्रामपंचायततर्फे अपंग लाभार्थ्यांना अनुदान वाटप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२२ । रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथे ग्रामपंचायत ग्रामनिधीतुन ५% वैयक्तिक लाभ योजनेच्या माध्यमातून गोर गरीब गरजू अपंग बांधवांना प्रत्येकी एक हजार प्रमाणे ७३ लाभार्थ्यांना धनादेशाद्वारे वाटप करण्यात आले. त्यात काही अपंग लाभार्थ्यांनी आपल्या कडील घरपट्टी, पाणीपट्टी मिळकत कर थकबाकीत भरणाकरुन लाभ घेतला तर ज्या लाभार्थ्यांकडे घर नाही त्यांना धनादेशाचे चेक देण्यात आले.

यावेळी सरपंच मुबारक अलिखा तडवी, ग्रामविकास अधिकारी गणेश सुरवाडकर, उपसरपंच लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य कालू मिस्तरी, सदस्य नितीन किसन सुपे, संजय काशिनाथ माळी, भुषण बाळू चौधरी, उदय प्रभाकर पाटील, हाजराबी करीम पिंजारी, प्रमिलाबाई युवराज भालेराव, अमिनाबाई सुभान तडवी, हर्षा विशाल पाटील, मिनाक्षी हर्षल पाटील, साधनाबाई निळकंठ महाजन, भाग्यश्री बाळू वाघ, संगिता स्वप्निल पवार, सुमनबाई शंकर कापसे, क्लार्क प्रकाश वायके, पंकज मालखेडे, सुनिल पाटील, राहुल महाजन, अजय कराड, भुषण नेहते आदी कर्मचाऱ्यांसह गावातील अपंग लाभार्थी महिला, पुरुष मुले, मुली उपस्थित होते.

Related Articles

Back to top button