जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२२ । सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात. निवडणुका संपल्या असून, त्यामुळे देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्यात आले आहेत. मात्र, गेल्या 3 महिन्यांपासून सरकारी तेल कंपन्यांनी तेलाच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. आज मंगळवारी देशभरातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र, चेन्नईत इंधन दरात किंचित वाढ झाली. दरम्यान, आज जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव सार्वकालिक उच्चांकी पातळीवर पोहोचले असतानाही भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाच्या दरात वाढ केली नव्हती. मात्र, पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यामुळे देशभरात इंधनाचे दर सुस्साट वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, आज सोमवारी पेट्रोलियम कंपन्यांनी सलग १२३ व्या दिवशी प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल डिझेल दर जैसे थे ठेवले आहेत.
आज जाहीर झालेल्या नवीन दरानुसार, देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये 82.96 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे, तर डिझेलही येथे 77.13 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याच वेळी, महानगरांमध्ये, मुंबईत पेट्रोल सर्वात महाग आहे 109.98 रुपये आणि दिल्लीमध्ये सर्वात स्वस्त आहे 95.41 रुपये. त्याचवेळी भापाळ, जयपूर, पाटणा, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल 100 च्या पुढे आहे.
किती वाढू शकतात पेट्रोल आणि डिझेलचे दर
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २५ रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत शेवटचा बदल करण्यात आला, तेव्हा कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल ८१.५ डॉलर होती. आता ती १३० डॉलरच्या पुढे गेली आहे. म्हणजेच, आतापर्यंत त्याची किंमत सुमारे ५० डॉलरने वाढली आहे.