प्रा. रेखा महाजन यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

मार्च 7, 2022 12:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२२ । चोपडा तालुक्यातील धानोरा येथील झि.तो. महाजन माध्यमिक व ना. भा. पाटील ज्युनियर कॉलेजच्या प्रा. रेखा रूपचंद महाजन यांना नुकताच महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जिल्हा शाखा जळगाव आयोजित “तात्यासाहेब जोतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कारने” पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

purskar jpg webp

त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बी. एस.महाजन, धानोरा हायस्कूलचे चेअरमन सुखदेवराव पाटील, प्राचार्य के.एन. जमादार, शालेय समिती सदस्य वामनराव महाजन, प्रदीप महाजन, बाजीराव पाटील, माजी उपसभापती माणिकचंद महाजन, देविदास महाजन, एस. पी. महाजन आदींनी अभिनंदन केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now