⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | संतापजनक ! १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सेवानिवृत्त शिक्षकाचा अत्याचार

संतापजनक ! १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सेवानिवृत्त शिक्षकाचा अत्याचार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२२ । भुसावळ शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एक १२ वर्षीय मुलीवर सेवानिवृत्त शिक्षकाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी संशयीत आरोपी जयंत रायन (७५) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.

रविवार, ६ मार्च २०२२ रोजी दुपारच्या सुमारास पीडित १२ वर्षीय मुलगी दुपारी दोन वाजता ट्यूटशनला आली असता यावेळी कुणीही आले नसल्याची संधी साधून संशयीत आरोपी तथा सेवानिवृत्त शिक्षक जयंत रायन (७५, रा.भुसावळ) याने पीडीत मुलीवर अत्याचार केला. हा प्रकार पीडीतेने घरी आल्यानंतर आईला सांगितला. त्यानंतर सोमवार, ७ रोजी पीडीतेच्या कुटुंबियांनी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांची भेट घेवून घडलेला प्रकार सांगितला.

याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात भाग 5 सीसीटीएनएस गुरंन १४१/२०२२ भादंवि 376 (अ.ब) 376, (3) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6 प्रमाणे जयंत रायन या नराधम सेवानिवृत्त शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली. अधिक तपास सहा.निरीक्षक मंगेश गोंटला हे करीत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.