जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२२ । रशिया आणि युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमती 2008 नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. ब्रेंट क्रूडच्या किमतीने प्रति बॅरल 139 डॉलरचा उच्चांक गाठला आहे. कच्च्या तेलाच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी आज सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आज देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाहीय
गेल्या सुमारे १२३ दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.१० मार्च रोजी देशभरातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल दरात तब्बल २५ रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कच्च्या तेलाच्या दरात वाढल्याने महसूल कमी होत असल्याने सरकारकडे पेट्रोल-डिझेल दरात वाढ करण्याशिवाय पर्याय नाही, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, आज जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे.
देशभरातील मोठ्या शहरातील पेट्रोलचे दर
मुंबईत एक लीटर पेट्रोलचा दर १०९.९८ रुपयांवर आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर १०१.४० रुपये आहे. कोलकाता येथे एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०७.२३ रुपये आहे. तर देशात सर्वांत कमी दरात पेट्रोल आणि डिझेल लखनऊ शहरात मिळत असून, एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.२८ रुपये आहे.
डिझेलचे दर
मुंबईत डिझेलचा दर ९४.१४ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपयांवर कायम असून, चेन्नईत डिझेल ९१.४३ रुपये आहे. कोलकाता येथे डिझेलचा दर ८९.७९ रुपये कायम आहे. भोपाळमध्ये डिझेलसाठी ९०.८७ रुपये दर आहे. लखनऊ एक लीटर डिझेल दर ८६.८० रुपये आहे.