⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | विद्यार्थ्यांनी आत्मसंरक्षणासाठी स्वतःला सिद्ध करावे – पोलीस निरीक्षक इंगळे

विद्यार्थ्यांनी आत्मसंरक्षणासाठी स्वतःला सिद्ध करावे – पोलीस निरीक्षक इंगळे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२२ । विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच स्वतःला आत्मसंरक्षणासाठी सिद्ध करावे, शारीरिक व मानसिक सुदृढतेसाठी नियमित व्यायाम करावा, असे आवाहन पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी केले.

पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक, डॉ. हेडगेवार प्राथमिक विद्यालय आणि मार्शल आर्ट अँड स्पोर्ट अकॅडमी तर्फे आयोजित तायक्वांदो प्रशिक्षणार्थांच्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. शनिवारी शाळेच्या प्रांगणात गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी ९ वीच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. यावेळी सरस्वती देवी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक रामचंद्र वानखेडे होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव अजित घारगे, शेंदुर्णी येथील तायक्वांदो प्रशिक्षक श्रीकृष्ण चौधरी यांनी मार्गदर्शन केले. माजी सरपंच शंकर जाधव, संचालक समाधान पाटील, अशोक बनकर, संजय पाटील, डॉ . हेडगेवार प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी ४१ प्रशिक्षणार्थ्यांना तायक्वांदो क्रीडा प्रकारातील उज्वल यशाबद्दल प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी स्पोर्ट अकॅडमीचे संचालक हरीभाऊ राऊत यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रास्ताविक हरिभाऊ राऊत यांनी केले. सांस्कृतिक प्रतिनिधी शंकर भामेरे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका व्ही.व्ही. घोंगडे यांनी आभार मानले. याप्रसंगी के. ए.बनकर, ए.एम. क्षीरसागर यांच्यासह सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रकाश जोशी, अनिल पवार , संजय बनसोडे यांनी सहकार्य केले.

यांचा झाला सन्मान
मोहिनी राऊत, पलक जोशी, दिव्या जोशी, सुकन्या लहासे , वृषाली पवार, श्रावणी लोहार, दिपाली भिवसने, तृप्ती घोंगडे, आकांक्षा जाधव, निकिता घोंगडे, कांचन घोंगडे, वैष्णवी घोंगडे, वैष्णवी सोनवणे, नंदिनी सोनवणे, गौरी कुमावत, कुश उबाळे,
रुद्र उबाळे, यश राऊत, कार्तिक सोनवणे, कुंदन कुमावत, देवेश सोनवणे, अक्षय जाधव, भूषण मगरे, सुहास काळे, नवल कोडें,
ईश्वर क्षिरसागर, सतिष क्षिरसागर, गौरव गव्हाळे, हितेश पवार, वेदांत क्षिरसागर, अनिकेत माळी, हर्षल उदमले, सुमित चौधरी, सौरभ कोंडे, आशिष लोहार, अजय घोंगडे, दिनेश राऊत, धनंजय सोनवणे, यश कुमावत, हरिश घाटे, शेख इजराईल.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह