जळगाव जिल्हा
कुसुंबा खु. येथे लोकसंघर्ष मोर्चातर्फे रेशनकार्ड व १२ अंकी कार्डचे वाटप
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२२ । कुसुंबा खु. येथे लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या हस्ते नविन रेशनकार्ड व १२ अंकी कार्डचे वितरण करण्यात आले.
कुंसुंबा ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घुगे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. आम्ही आमचे वचन पाळले हे कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेले फलक लक्षवेधुन घेत होते. सामान्य लोंकाना त्यांच्या हक्का रेशनकार्ड कार्ड उपलब्ध झाल्यामुळे लोंकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. यावेळी सोनवणे, कलिंदर तडवी, शैलेश साळुंखे, गणेश पाटील, भरत महाजन, किरण राजपुत, भुषण राजपुत, धनजंय दुसाने, दिपक पाटील, धनसिंग पाटील योगेश घुगे यांनी परीश्रम घेतले.