जळगाव जिल्हाजळगाव शहर

जळगावची चित्रकार पियुषा कुलकर्णीचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२२ । चित्रकलेत सुध्दा उत्तम करियर करता येते, आणि जागतिक स्तरावर आपण आपली कामगिरी दाखवू शकतात. याचे उदाहरण जळगावची चित्रकार पियुषा कुलकर्णी यांनी दिले आहे.

चित्रकार पियुषा कुलकर्णी हिचा राज्यपालांच्या हस्ते नुकताच गौरव करण्यात आला. ही बाब शहरवासींसाठी आनंदाची आहे. कुळकर्णी हीचा ऑबस्ट्रॅक्ट पेंटिंगला दि बॉम्बे आर्ट सोसायटीने (The oldest prestigious Bombay Art Society – 1888) १३० व्या अखिल भारतीय कलामहोत्सवात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशायारी यांच्या हस्ते सन्मान चिह्न प्रदान करुन गौरवण्यात आले.

भारतातील व्यावसायिक कलाकार गटात २,२१६ आर्टिस्ट मधून ज्युरी मेंबर्सने १७० स्पर्धकांचे पेंटिंग जहांगीर आर्ट गँलरीत प्रदर्शनात ठेवले आहे. व त्यातील २६ जणांना जहांगीर आर्ट गँलरी येथे सन्मान करण्यात आला. पियुषा हिस सुप्रसिद्ध जे जे स्कुल आँफ आर्टचे प्रोफेसर प्रभाकर कोलते आणि जाँन तुनसैंन (जर्मनी) यांच्याकडून मार्गदर्शन व वैचारीक कलाप्रेरणा मिळत आहे.

पियुषाचे शालेय शिक्षण ब.गो. शानबाग शाळेतून झाले. शहरातील सुप्रसिद्ध चित्रकला शिक्षक सचिन मुसळे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. तीचे M.Sc. (Bio technology) हे शिक्षण पुणे येथील modern college येथून झाले आहे.

पियुषा ही निजानंदी डिस्ट्रिब्युटर्सचे संजय मधुसुदन कुळकर्णी यांची कन्या आहे. शहरातील विविध मान्यवरांकडून तिच्या या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Back to top button