⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

देवकर रूग्णालयाने गाठला 275 शस्त्रक्रियांचा टप्पा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२२ । येथील शिरसोली रस्त्यावरील गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाने सवलतीच्या दरात होणाऱ्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेत दोन महिन्यात 275 शस्त्रक्रियांचा टप्पा गाठला आहे. या रुग्णांना अंधूक प्रदृष्टीकडून लख्ख उजेडाकडे नेण्याचे काम अत्यल्प दरात रुग्णालयाने केल्याने सर्वसामान्य रुग्णांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

मोतीबिंदूमुक्त अभियानात देवकर रुग्णालयात दर गुरुवारी पंचवीस जणांवर अत्यल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. त्यात सलग अकराव्या गुरुवारी (दि. 3 मार्च) रुग्णालयाने 25 शस्त्रक्रिया करून 275 शस्त्रक्रियांचा टप्पा पार केला आहे.
येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त 2500 रुपये, तर फेको शस्त्रक्रिया अवघ्या 6000 रुपयांत होत असल्याने रुग्णांची मोठी आर्थिक बचतही होत आहे.

जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री आप्पासाहेब गुलाबराव देवकर यांच्या संकल्पनेनुसार गरजू रुग्णांना आर्थिक दिलासा देण्यासाठी अत्यल्प दरात या शस्त्रक्रिया होत असल्याने सर्वसामान्य रुग्णांना त्याचा लाभ घेता येत आहे. रुग्णाच्या फिटनेस सर्टिफिकेटसाठी सर्व तपासणी, दवाखान्यातील निवास व भोजनाचा खर्च याच पैशांत होत असल्याने रुग्णांमध्ये मोठे समाधान आहे.

देवकरांकडून जातीने विचारपूस

रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्यानंतर येथील सोयी सुविधा, अत्याधुनिक उपकरणे, डॉक्टर, परिचारिकांची सेवा यांच्याबाबत देवकर हे स्वतः रुग्णांशी संवाद साधून विचारपूस करीत आहेत. सर्व रुग्णांनी येथील सेवेबाबत समाधान व्यक्त करत अत्यल्प दरात शस्त्रक्रिया केल्यामुळे देवकर यांचे आभार मानले आहेत.