⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | बातम्या | सोने दराने गाठला १४ महिन्यातील उच्चांकी स्तर, जाणून घ्या आजचे दर

सोने दराने गाठला १४ महिन्यातील उच्चांकी स्तर, जाणून घ्या आजचे दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२२ । रशिया आणि युक्रेन युद्धाची झळ जागतिक बाजारावर होत असल्याचे दिसून आले. युद्धाने होणारे दूरगामी परिणामी लक्षात घेता बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीला पसंती दिली आहे. यामुळे सध्या सोन्याच्या दरात तेजी आली आहे. जळगाव सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळ्याचा दर ५२,९८० रुपये इतका आहे. मागील १४ महिन्यातला सोन्याचा हा उच्चांकी स्तर आहे. तर दुसरीकडे चांदी ६९,५०० रुपये प्रति किलो इतका आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज १० वा दिवस आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळाले. या आठवड्यात सोन्याच्या दरात २०० ते ३०० रुपयाची वाढ दिसून आली. तर दुसरीकडे मात्र, चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. चांदीच्या दरात जवळपास ३ हजार रुपयाची वाढ झाली आहे.

दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढल्यास सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल, असे मानले जात आहे. सोने लवकरच ६०,००० रुपये प्रति १० ग्रॅमची पातळी गाठू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

या आठवड्यातील दर?
जळगाव सराफ बाजारात सोमवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५१,४०० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ५१,४००, बुधवारी ५३,०३०, गुरुवारी ५२,५०० , शुक्रवारी ५२,९८० रुपये इतका होता. दुसरीकडे सोमवारी चांदीचा प्रति किलोचा दर ६५,५२० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ६५,५२०, बुधवारी ६८,५७०, गुरुवारी ६८,५३०, ६९,५०० रुपये प्रति किलो इतका होता.

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.